मी मराठी माय मराठी

Mi Marathi Mai Marathi 

साहित्यदालन Literature

EmailFacebookInstagramYouTube

दूरभाष:  (९१३) ३३६ - ७०५५

Tel:  (913) 336 - 7055

मंडळाच्या सदस्यांचे लेख, कविता, प्रवास वर्णनं आपण या सदरात प्रसिद्ध करतो. यासाठी आपले लिखाण आम्हाला ईमेलने अथवा  येथे पाठवावी. 

शब्दांची सूर्यफुले

वर्ष 1, अंक १ मार्च २०२२ 

शब्दांची सूर्यफुले

वर्ष 1, अंक २  जून २०२२  

शब्दांची सूर्यफुले

वर्ष 1, अंक 3 (दिवाळी विशेष आवृत्ती), ऑक्टोबर २०२२ 

शब्दांची सूर्यफुले

वर्ष 1, अंक ४  जानेवारी २०२३ 

कॅन्सस सिटी मधील साहित्यदालनामध्ये आपले सहर्ष स्वागत.

येथे मंडळाचे सदस्य आपले साहित्य, निबंध, कविता, चित्रकला इत्यादी प्रकाशित करू शकतात. साहित्यप्रकाराचे बंधन नाही वा कुठल्याच विषयाचं वावडं नाही. कथा, ललित, स्फुट, कविता, चारोळी, शब्दकोडे, विनोद, कोडे, व्यंगचित्र, मराठी व्यक्ती, संतमहात्मे, शिवराय, आपले सण समारंभ, बालपणीच्या आठवणी, मोठेपणाची (वय आणि कर्तृत्व देखील) स्वप्न, सरळसोट, चुकलेल्या वाटा, पाककृती, बल्लवाचार्यांचे पाकानुभव, हरवलेल्या पाककृती, चिमटे काढणारं, गुदगुल्या करणारं लिखाण पाठवावे.

लेखावरच्या आणि या साहित्यिक उपक्रमावरच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हास जरूर कळवाव्यात.

आपली कलाकृती येथे पाठवावी.


* मराठी लेख 'रांगोळी' - मधुरिमा डबली

रसिक जन हो, २७ फेब्रुवारी ! कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ! या अतुलनीय सारस्वताच्या स्मृतीचा गौरव करण्यासाठी आजचा दिवस "मराठी भाषा दिन" म्हणून जगभरातल्या मराठी समुदायात साजरा केला जातो. आपण सारे जण आपल्या मायभूमीपासून इतकी दूर आहोत ! अमेरिकन वातावरणात वाढणार्‍या मुलांचे पालक म्हणून आपल्याला नेहेमीच काळजी वाटत राहते. ज्या मराठी भाषेच्या अंगणात आपण घडत गेलो त्या अंगणाचा पिढीजात हक्क आपल्या मुलांना मिळू शकत नाहीय याची खंत मनात सलत राहते. दोष इंग्रजी वातावरणात वाढणाऱ्या आपल्या मुलांचा नाही की त्यांना मराठी अभिमानाची गौरवशाली जहागीर मिळावी म्हणून सतत धडपडणाऱ्या आपल्यासारख्या पालकांचीही नाही ! वेगाने कोसळणारा नायगारा मनाला कितीही विस्मित करीत असला तरी दऱ्या-खोऱ्यातून जीवन फुलवीत जाणारे लहानसहान झरे काही कमी मोलाचे नसतात ! मराठी भाषा दिनानिमित्त याच विषयावरचा एका आईचा आशावाद "रांगोळी" या लेखाद्वारे आम्ही आपल्या समोर प्रस्तुत करीत आहोत. मराठी भाषा दिनाची ही आगळी वेगळी भेट आपणांस मनापासून आवडेल अशी आशा वाटते.

* मराठी लेख 'माझं गाडीपुराण' - मधुरिमा डबली, लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्यापैकी सगळ्याजणी काही अमेरिकेला येताना भारतातून गाडी चालवायला शिकून आलेल्या नसतात. इथे आल्यावरती मात्र शिकावीच लागते. त्या साऱ्या अनुभवांची ही ' खुशखुशीत शिदोरी' घेऊन आल्या आहते मधुरिमा डबली - खास मंडळाच्या वाचकासाठी..

* मराठी कविता - अनघा देवळे, कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा

* मराठी लेख ' वसुंधरा वाचवा ' - वैशाली शिंपी, लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विश्वातील समस्त जड-चेतन सृष्टीरचनेत कोणतीही वस्तू उद्येशहीन किंवा निरर्थक असत नाही. सूक्ष्मातिसूक्ष्म जीव-जंतुंपासून अजस्त्र श्वापदांपर्यंत, वाळुच्या सूक्ष्म कणांपासून प्रचंड पर्वतांपर्यंत, शेवाळवर्गीय वनस्पतींपासून ते अतिविशाल वटवृक्षांपर्यंत प्रत्येकाचे काही ना काही प्रयोजन असते. माणूस सोडला तर प्रत्येकजण प्रकृतीच्या नियमानुसार आपापले स्वभावगत वैश्विक कार्य करित असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या खार्‍या पाण्यापासून गोडया पाण्याचे मेघ तयार होतात. धरती माता आनंदीत होऊन मेघांकडून जल मिळविते. मेघांचे अमृत धरती मातेला सुपीक बनवते. तिच्या सृजन शक्तीने पृथ्वीवरील सजीवांचे पोषण होते. ही वसुंधरा आपणांसारख्या प्राण्यांना, वनस्पतींना, मोठमोठया पर्वतांना,नद्या सागरांना धारण करते.धराच आपले संरक्षण करते,पालन-पोषण करते व प्रसंगी विनाशही करते. मोठमोठे पर्वत धैर्यशीलतेची शिकवण देतात. नद्या गतिशिलता व निर्मलता शिकवतात. वनस्पती आपल्याला धनधान्य,औषधी व प्राणवायू देऊन परोपकाराची आठवण करुन देतात.धरती सहनशीलतेचे मुर्तीमंत उदाहरण आहे. यंदाही पावसाने वसुंधरा हिरवीगार झालीय त्यानिमित्ताने हा लेख …

* मराठी कविता 'शब्द्च्छल' - अनघा देवळे, कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तशी बिचारी एकटीच ती पाहून माझी कविता , पाठवली ही, बघा जरा हो , जमली का ही वात्रटिका !