मंडळेतर संस्था

संपर्क: इमेल | फेसबुक | इंस्टाग्राम | व्हाट्स ऍप | English दूरभाष: (९१३) ३३६ - ७०५५

मराठी शाळा

काही ध्येयवेडे स्वयंसेवक एकत्र येऊन स्वयंस्फूर्तीने कॅन्सस सिटी येथील मराठी शाळा हा उपक्रम राबवितात. आपल्या पुढील पिढयांना मराठीचा गंध असावा, त्यांनी मराठी लिहायला, वाचायला आणि बोलायला शिकावं आणि महाराष्ट्राच्या संपन्न परंपरांची त्यांना ओळख व्हावी हा ह्या उपक्रमाचा उद्धेश.


मराठी प्रशिक्षण वर्ग २०१४ पासून कॅन्सस सिटी येथे कार्यरत आहे. वय वर्षे ४ च्या पुढील मुले येथे येऊन मराठी शिकतात. हलक्या फुलक्या वातावरणात आणि तरीही नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक रविवारी येथे मराठी शिकविले जाते.


अधिक माहिती आणि नोंदणीसाठी येथे संपर्क करावा: MarathiShalaKC@gmail.com